भोजपुरी अभिनेत्याची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या, चित्रपटक्षेत्रात खळबळ

2167

बिहारमध्ये दिवसाढवळ्या भोजपुरी अभिनेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे राज्यात सर्वकाही सुरळीत असल्याचा नितीश कुमार सरकारचा दावा किती पोकळ आहे हे दिसते.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी समस्तीपूर जिल्ह्यात भोजपुरी चित्रपटातील अभिनेता मिथलेश पासवान यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. स्थानिक नागरिकांनी गोळीबाराची माहिती पोलिसांनी दिली. यानंतर पोलिसांनी घटस्थळी दाखल होत अभिनेत्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता मिथलेश आपल्या बुलेटवर बसून आधारपूर या गावी जात होते. आधारपूर गावाच्या खादी भंडार चौकात दुचाकीस्वारांनी त्यांना ओव्हरटेक केले. यावरून त्यांच्यामध्ये वादावादीही झाली. हा वाद एवढा वाढला की दुचाकीस्वारांनी अभिनेत्याला भर चौकात गोळ्या घातल्या. गोळीबारानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. आजूबाजूच्या लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मिथलेश यांना समस्तीपूर रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे.

दरम्यान, या हत्येमुळे भोजपुरी चित्रपटक्षेत्रात खळबळ उडाली असून चित्रपट कलाकारांनी याचा निषेध केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या