
भुसावळ येथील तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वराडसिम येथे पाण्याच्या टाकीजवळ दोन तरुण 15 हजार रुपये किमतीच्या गावठी पिस्तुलसह आढळले. राजेश रमेश तायडे (वय -27, रा. पाडळसे ता.यावल ह.मु.आसोदा) व सचिन संतोष सपकाळे (वय -26, वर्ष रा.वराडसिम) अशी दोघांची नवे आहेत. या प्रकरणी दोघांविरुद्ध भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट 3/25 मुंपो. कायदा कलम 37(1)(3)135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सपोनि. रुपाली चव्हाण, पोहेकॉ. युनूस इब्राहिम शेख, युनूस मुसा शेख, विठ्ठल फुसे, राजेंद्र पवार, संजय मोंढे, ईशान तडवी, होमगार्ड जगदीश पाटील यांनी केली.
























































