बिग बॉसचे घर यंदा मुंबईत; 13 वा सीझन लवकरच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

बिग बॉस या वादग्रस्त रिऑलिटी शोचा 13 वा सीझन लवकरच सुरू होणार आहे. हा भागही सलमान खानच होस्ट करणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये घरातील सदस्यापैकी  एक सदस्य चंकी पांडेच्या नावावर शिक्कामोर्तबही झाले आहे. तर अभिनेत्री, मॉडेल मुग्धा गोडसे, रश्मी देसाई, गायक आदित्य नारायण, मिहीका शर्मा हे सेलिब्रेटी यंदा बिग बॉसच्या घरात राहणार असल्याची चर्चा आहे. यंदा बिग बॉसच्या घराचा पत्ता बदलला असून लोणावळ्याऐवजी मुंबईतील गोरेगाव येथे बिग बॉसचे घर असणार आहे. खर्चात कपात करण्याच्या दृष्टीने लोणावळ्याऐवजी मुंबईत सेट उभारण्यात येणार आहे.