बिग बॉस मधील ‘या’ अभिनेत्रीने केले पाचव्यांदा लग्न

2201

प्रसिद्ध हॉलिवू़ड अभिनेत्री पमेला अँडरसनने नुकतेच निर्माते जॉन पीटर्ससोबत लग्न केले आहे. पमेलाचे हे पाचवे लग्न असून तिच्या या लग्नाची सध्या हॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा आहे. या अभिनेत्री हिंदुस्थानातील प्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉसच्या चौथ्या सिझनमध्ये देखील सहभागी झाली होती.

pamela-anderson-big-boss-1

पमेलाचे पहिले लग्न हे अमेरिकन संगीतकार टॉमी याच्यासोबत झालेले. मात्र तीन वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर तिने किड रॉकी या अभिनेत्यासोबत लग्नगाठ बांधली. रॉकीसोबत वेगळं झाल्यानंतर चित्रपट निर्माते रिक सोलोमन तिच्या आयुष्यात आले. त्यांच्यासोबत वर्षभर संसार घेतल्यानंतर त्या दोघांनीही काडिमोड घेतला. जवळपास पाच वर्ष वेगळे राहिल्यानंतर पुन्हा तिने सोलोमनसोबतच लग्न केले. मात्र यावेळेसही हे लग्न फार काळ टिकले नाही. त्यानंतर काही काळ ती फ्रेंच सॉकर खेळाडू आदिल रामी याच्या प्रेमात पडली होती. त्याच्यासाठी ती फ्रान्सला स्थायिक झालेली. मात्र हे प्रेमसंबंध देखील फार काळ टिकले नाही. त्यानंतर आता पमेलाने चित्रपट निर्माते जॉन पीटर्ससोबत लग्न केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या