बिग बॉसच्या घरातही पाळावी लागणार सोशल डिस्टिंन्सग!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरातून बाहेर पडताना संसर्गापासून वाचण्यासाठी सर्वांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक आहे. अगदी रियॅलिटी शो बिग बॉसच्या घरात देखील आता स्पर्धक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करताना दिसणार असून स्पर्धकांना सुरुवातीच्या आठवड्यात कोणतेही शारीरिक टास्क दिले जाणार नाहीत अशी माहिती आहे. छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रियॅलिटी शो बिग बॉसचा 14 वा सिजन लवकरच सुरू होणार आहे. 3 ऑक्टोबरला ग्रँड प्रीमियर होणार आहे.

त्यात सलमान स्पर्धकांची ओळख करून देणार आहे. शो मध्ये सहभागी होणारे स्पर्धक बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी क्वारंटाईन होणार आहेत. याशिवाय सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी घरात अनेक बदल करण्यात येणार आहेत. पूर्वीप्रमाणे दोन बेड एकत्र नसतील, तसेच स्पर्धकांना सुरुवातीच्या आठवड्यात लग्जरी बजेट, एलीमिनेशन आणि शारीरिक टास्क देखील नसतील.

स्पर्धकांना करावी लागणार कोरोना टेस्ट
बिग बॉसच्या घरात जाणाऱ्या स्पर्धकांची 20 सप्टेंबरला कोरोना टेस्ट होणार आहे. त्यानंतर त्यांना काही दिवस क्वारंटाईन केले जाईल. याशिवाय बिग बॉसची मेडिकल टीम प्रत्येक आठवड्यात स्पर्धकांच्या आरोग्याची तपासणी करणार आहे.

लॉकडाऊन असणार शोची थीम
यंदा लॉकडाऊन हीच शोची थीम असणार आहे. कोरोनासंबंधी नियमावलीचे पालन करताना स्पर्धकांना केवळ त्यांना दिलेलेच सामान वापरण्यास परवानगी असणार आहे. प्रत्येक स्पर्धकाला वेगळे बिछाने आणि भांडी मिळणार आहेत. सेटवर ग्रीन झोन देखील असणार आहे. घरात मिनी स्पा, थिएटर, मॉल अशा सुविधा देखील असून लग्जरी बजट जिंकणाNया स्पर्धकांनाच याचा फायदा घेता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या