
कोणता वाद किती विकोपाला जाईल ते सांगता येत नाही. मध्यप्रदेशात एक विचीत्र घटना घडली आहे. टॉयलेटमधून बाहेर यायला उशीर झाल्याने मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
मध्यप्रदेशातील इंदूर येथे ही घटना घडली आहे. मृत व्यक्तीचे नाव अब्दुल आहे. दोन कुटुंबात एकच टॉयलेट असल्याने कुटुंबात अनेकदा वाद होत होते. बुधवारी लहान भाऊ टॉयलेटला गेला असताना मोठ्या भावाच्या पोटात कळ आली. मात्र बराच वेळ बाहेर न आल्याने संतापलेल्य़ा मोठ्या भावाने लहान भावावर हल्ला केला. या हल्ल्यात तो जागीच ठार झाला.
वाद सुरु असताना अब्दुलची पत्नी नवऱ्याच्या बचावासाठी मध्ये पडली असता आरोपीने तिला वरच्या मजल्यावरुन ढकलून दिले. यामध्ये महिला जखमी झाली आहे. याप्रकरणी इंदूर पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे. अब्दुल हा व्यवसायाने पेंटर आहे, तर मोठा भाऊ मजूरीचे काम करतो.
कुटुंबामध्ये संपत्तीच्या वादातून भावांमध्ये भांडणं होतं असतात. हत्येच्या घटनाही समोर येत असतात. मात्र टॉयलेटमधून बाहेर यायला उशीर झाल्याने हत्या करण्यात आली. हे कारण क्षुल्लक होते. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे आणि घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन आरोपी भावाला अटक केली.
























































