
पश्चिम बंगालच्या शिक्षक भरती घोटाळ्यात नवनवीन खुलासे होत आहेत. आता याबाबत आणखी मोठी माहिती उघडकीस आली आहे. पार्थ चटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांनी 10 वर्षांपूर्वी 2012 मध्ये एकत्रितपणे एक फार्म हाऊस खरेदी केले होते. शांती निकेतनमध्ये या फार्म हाऊससाठी त्यांनी 20 लाख रुपये दिले होते.
अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून ईडीला 50 कोटींपेक्षा जास्त रोकड सापडली आहे. तसेच 5 किलो सोनेही आढळले आहे. तसेच पार्थ आणि अर्पिता यांच्या नावे अनेक संपत्ती असल्याची माहितीही मिळाली आहे.
हे फार्म हाऊस खरेदी करून त्याचे नाव अपा ठेवण्यात आले होते. अ म्हणजे अर्पिता आणि पा म्हणजे पार्थ. हेच नाव फार्मा हाऊसच्या नेमप्लेटवरही असेल. 24 परगणामधील एका फार्म हाऊसमधील चोरीची घटना घडली होती. ते फार्म हाऊसही पार्थ यांचे असल्याची माहिती उघडकीस आली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात रोकड आणि संपत्ती सापडलेली घरे अर्पिता यांच्या नाववर आहेत.
या प्रकरणी भाजपने हल्लाबोल केला आहे. या सर्व प्रकरणात तृणमूल काँग्रेसचा हात आहे. या प्रकरणातील सत्य उजेडात येईल. या प्रकरणात तृणमूलचे अनेक बडे नते असल्याचा आरोपही भाजपने केला आहे. ईडीला अर्पिता यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात रोकड,दागिने आणि मोठ्या प्रमाणात संपत्ती आढळली होती.





























































