फिफा विश्वचषक : कुठलाही संघ रिकाम्या हाताने परतणार नाही

39

सामना ऑनलाईन | मॉस्को

रशियातील यंदाच्या २१ व्या फिफा विश्वचषकात ३२ संघांनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेसाठी फिफाने एकूण ४०० दशलक्ष डॉलर ( सुमारे २७०० कोटी रुपये ) इतकी प्रचंड इनामाची रक्कम ठेवली आहे. यंदाचा  विजेता संघ   ३८ दशलक्ष डॉलर  (सुमारे २६० कोटी रुपये ) तर उपविजेता संघ २८ दशलक्ष डॉलर ( सुमारे १९१ कोटी रुपये) इतक्या रोख पारितोषिकाचा धनी ठरणार आहे. तिसऱ्या क्रमांकाच्या बेल्जियम संघाला रोख १६४ कोटी रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. अर्थात फिफाने अन्य सर्व सहभागी संघाच्या झोळीतही आकर्षक रक्कम टाकण्याची घोषणा केली आहे. स्पर्धेतील सर्व ३२ संघांपैकी प्रत्येक संघ आपल्या कामगिरीनुसार किमान ८० लाख डॉलर ( सुमारे ५४ कोटी रुपये ) इतकी रोख रक्कम  मिळवत  घरी परतणार आहे. २०१४ चा विश्वचषक जिंकणाऱ्या जर्मनीला २३९ कोटी रुपये इतके  रोख पारितोषिक मिळाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या