टिळक रोडवर वाहतुकीची कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा

907

पुण्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पावसासह जोरदार वारे आणि विजांचा कडकडाटही असल्याने अनेक ठिकाणी लाईट गेली. जोरदार पावसामुळे टिळक रोडवरील एसपी कॉजेलजवळ पीएमपीएल बसवर झाड कोसळले. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

tilak-road1

पुण्यात बुधवारी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. जोरदार पाऊस, वादळी वारे आणि विजांचा कडकडात यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले, वाहतुकीची कोंडी झाली. टिळक रोडवरील ग्राहक पेठेजवळ मोठे झाड कोसळल्याने काही लोक जखमी झाले आहेत. झाड कोसळल्याने रस्ता जाम झाला असून वाहतूक कोंडी झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या