Bigg Boss 16 मारुन मारुन तुला मोर बनवेन, बिग बॉसमध्ये सौंदर्यवती भिडल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिग बॉस हिंदीचा सोळावा सिझन अवघ्या दोन आठवड्यातच गाजू लागला आहे. बिग बॉसच्या घरात दोन गट पडले असून दोन्ही गटात कायम वाद होताना दिसत आहेत. सर्व सेलिब्रिटींना त्यांचा एक ग्रुप तयार केला असून नॉन सेलिब्रिटी एका ग्रुपमध्ये आहेत. नॉन सेलिब्रिटींमधली अर्चना गौतम ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या भांडणांमुळे चांगलीच गाजत आहे.

लेटेस्ट एपिसोडमध्येही अर्चना गौतम हिचे सौंदर्या शर्मा व टीना दत्ता सोबत जबरदस्त भांडण झालं. सौंदर्या शालीनसोबत डायनिंग टेबलवर बसून जेवत असताना अर्चना देखील तिथे आली. त्यावेळी शालीनने सौंदर्याला सांगितले की त्याने अचर्नाला नाही मारलं. त्यावर अर्चना म्हणाली की यापुढे हिंमतही करू नकोस. त्यावरून सौंदर्या व अचर्नामध्ये वादावादी झाली. हा वाद एवढा वाढला की त्यावर अर्चना भडकली व तिला म्हणाली की तुला मारून मारून मोर बनवेन.

त्यावरून दोघींमध्ये चांगलीच खडाजंगी रंगली. मात्र त्यानंतर सौंदर्याने अचर्नाच्या क्लासवर कमेंट केली. आई वडिलांनी शिस्त शिकवली नाही, हिचा काही क्लासच नाही , असे म्हणत अर्चनाला फटकारले. त्यावरून अर्चना भडकली व तिने देखील सौंदर्यावर टीका केली. ”तुझा क्लास मला माहिती आहे. ऑडिशन द्यायला जाते कुणी विचारत देखील नाही. पुर्ण मुंबईत नाव खराब आहे हिचं” अर्चनाचे ते स्टेटमेंट ऐकून सौंदर्याला ऱडू कोसळलं व ती बेडरुममध्ये जाऊन ओक्साबोक्सी रडू लागली.