
बिहार विधानसभा निवडणुकीत शेवटच्या तिसऱया टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच मंगळवारी जदयूचे सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांना जनतेच्या संतापाला सामोरे जावे लागले. मजुबनी येथे प्रचार सभा सुरू असताना त्यांच्या दिशेने कांदे, दगड फेकण्यात आले. यावेळी नितीशकुमार म्हणाले, ‘फेका, जेवढे फेकायचे आहेत तेवढे फेका.’ पोलिसांनी कांदा, दगडफेक करणाऱयांना ताब्यात घेतले.
बिहारमध्ये भाजप-जदयूची एनडीए विरुद्ध राजद-काँग्रेसचे महागठबंधन अशी जोरदार लढत आहे. राजद अध्यक्ष तेजस्वी यादव यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने बिहारमध्ये सत्ता परिवर्तन होणार असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे.

























































