गुप्तेश्वर पांडेंची स्वेच्छानिवृत्ती, बिहारमध्ये भाजपच्या तिकिटावर लढणार!

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. पांडे आता भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणापासून पांडेंचे नाव चर्चेत आले होते.

1987 बॅचचे आयपीएस असलेले गुप्तेश्वर पांडे यांनी जानेवारी 2019 मध्ये बिहारचे पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्विकारला होता. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि वेंâद्र सरकारने त्यांचा अर्ज 24 तासात मंजूरही केला आहे. दरम्यान, पत्रकारांशी बोलताना पांडे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले. मात्र, मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जदयु का भाजप हे स्पष्ट केले नाही. दरम्यान, 2009 मध्येही भाजपकडून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. मात्र, त्यांना भाजपने तिकीट दिले नाही. त्यामुळे पांडे यांनी स्वेच्छा निवृत्ती मागे घेतली आणि पोलीस दलात दाखल झाले. आता यावेळी तरी पांडे यांना भाजप उमेदवारी देतो का हे पहावे लागेल.

आपली प्रतिक्रिया द्या