Bihar Election – नाभिक, कुंभार आणि लोहार कुटुंबांना प्रत्येकी ५ लाखांची आर्थिक मदत देणार, तेजस्वी यादव यांची घोषणा

बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून तेजस्वी यादव यांची घोषणा केली आहे. यातच रविवारी पाटणा येथे पत्रकार परिषदेत बोलताना तेजस्वी यादव म्हणाले की, “जर राज्यात त्यांचे सरकार स्थापन झाले तर पंचायत प्रतिनिधी आणि इतर गाव प्रतिनिधींचे भत्ते दुप्पट केले जातील. माजी पंचायत आणि ग्राम प्रतिनिधींना पेन्शन देण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.”

शिवाय यादव-मुस्लिम समुदायांनंतर त्यांनी नाभिक, कुंभार आणि लोहार समुदायांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यांनी नाभिक, कुंभार आणि लोहार कुटुंबांना प्रत्येकी ५ लाखांची आर्थिक मदत देणार असल्याची घोषणा केली आहे. तेजस्वी यादव म्हणाले की, “बिहारच्या जनतेने त्यांना (भाजपाला) २० वर्षे दिली. आम्ही फक्त २० महिने मागत आहोत. मला जनतेवर पूर्ण विश्वास आहे की, यावेळी बदल होईल आणि सरकारही बदलेल. महाआघाडी एकत्र येऊन नवीन बिहार बांधण्यासाठी काम करेल.”

ते पुढे म्हणाले की, जर राज्यात त्यांचे सरकार स्थापन झाले तर पंचायत प्रतिनिधी आणि इतर ग्राम प्रतिनिधींचे भत्ते दुप्पट केले जातील. माजी पंचायत आणि ग्राम कचारी प्रतिनिधींना पेन्शन निधी देण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.” दरम्यान, बिहार विधानसभेच्या निवडणुका ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात होणार आहेत. मतमोजणी १४ नोव्हेंबर रोजी होईल.