रेल्वेच्या तिकीट काऊंटरवर पेट्रोल बॉम्ब हल्ला; टीसीसह तीन जण गंभीर जखमी   

1047

एका वृद्ध इसमाने रेल्वेच्या तिकिट काऊंटरवर पेट्रोल बॉम्बने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये टीसी राजेश कुमार यांच्यासह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बिहारमधील किशनगंज रेल्वे स्थानकावर घडली आहे. जखमींना गुजरी मेमोरियल मेडिकल महाविद्यालय रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इशाक शेख हा पटना येथील राहणार आहे. आरोपी शुक्रवारी सकाळी रेल्वेच्या तिकिट काऊंटरवर आला आणि त्याने आपल्याकडे असलेल्या बॅगेतून पेट्रोल बॉम्ब काढला. यानंतर आरोपीने या पेट्रोल बॉम्बची वात पेटवली आणि रेल्वेच्या तिकिट काऊंटरवर फेकला. यात टीसी राजेश कुमार गंभीर जखमी झाले. त्यांना वाचवण्यासाठी ई-रिक्षा चालक आजम हुसैन आणि पार्किंग कर्मचारी सुमित कुमार जात असताना या वृद्ध आरोपीने या दोघांवर चाकूने हल्ला केला. ज्यात हे दोघे जखमी झाले आहेत.

दरम्यान, रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी इशाक याने हा हल्ला का केला, हे अद्याप कळू शकलेले नाही. रेल्वे पोलीस याप्रकरणी आरोपीची चौकशी करत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या