
बिहारमधील सीतामढी येथे एका दलित महिलेला पोलीस अधिकाऱ्याने मारहाण केल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि मग वाद निर्माण झाला.
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आलेल्या या क्लिपमध्ये राज किशोर सिंग नावाचा पोलीस अधिकारी गणवेशात एका महिलेला काठीने मारझोड करताना दिसत आहे तर काही इतर दिसत आहेत.
पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीत असं सांगण्यात आलं आहे की, संबंधित महिला दुसऱ्या एका महिलेसोबत भांडण करत होती.
मात्र, पोलिसांनी व्हिडीओला दुजोरा दिलेला नाही. सीतामढीचे एसपी मनोज कुमार तिवारी यांनी, ‘अधिकारी दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल’, असं आश्वासन दिल्याचं इंडिया टुडे टीव्हीच्या वृत्तात म्हटलं आहे.
या व्हिडीओची जबाबदारी कुणीही घेतलेली नाही आणि सत्यता अद्याप पडताळू शकलेले नाही.
























































