अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन रुग्णालयात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना युरिन इन्फेक्शनचा त्रास होत आहे. अमेरिकन वेळेनुसार, मंगळवारी सायंकाळी त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती क्लिंटन यांचे प्रवत्ते एंजेल युरेना यांनी दिली आहे. दक्षिण पॅलिपहर्नियातील खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. क्लिंटन यांच्या रक्तातील पांढऱ्या पेशींची संख्या कमी झाली आहे. दोन दिवसांच्या उपचारानंतर क्लिंटन यांच्या प्रपृतीवर अॅण्टी-बायोटिक औषधांचा चांगला परिणाम दिसून येत आहे. त्यांची विशेष काळजी घेण्यासाठी पॅलिपहर्नियातील वैद्यकीय पथक न्यूयॉर्पच्या वैद्यकीय पथकाशी सतत संपका&त आहे. ते लवकरच बरे होऊन घरी परततील, अशी आशा आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.