लहान बाळासारखा रडतोय हा पक्षी, व्हिडीओ पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लहान बाळाच्या बाललिला कोणाला आवडत नाही. बाललिलांसह त्यांचे हसणे, बागडणे आणि रडणेही खास असते. रडणाऱ्या बाळाला शांत करण्यासाठी मग पालकांना आणि कुटुंबियांना नाही नाही ते उपाय करावे लागतात. हे झाले माणसाच्या बाळाबाबत, परंतु तुम्ही कधी एखाद्या पक्षाला लहान मुलाच्या आवाजामध्ये रडताना ऐकले आहे का? नाही ना, पण सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सिडनीच्या टॅरोंगा प्राणिसंग्रहालयाने एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक पक्ष जो आवाज काढतोय तो हुबेहुब लहान बाळाच्या रडण्यासारखा आहे. पहिल्यांदा हा आवाज ऐकूण प्राणिसंग्रहालयात येणारे लोकं देखील आजूबाजूला कोणते बाळ रडतेय काय म्हणून पाहतात. मात्र येथील कर्मचारी जेव्हा त्यांना सत्याची जाणीव करून देतात तेव्हा त्यांना यावर विश्वासच बसत नाही.

प्राणिसंग्रहालयातील कर्मचारी Leanne Golebiowski यांनी सांगितले की, या पक्षाचे नाव लायरबर्ड (lyrebird) आहे. हा पक्षी विविध प्रकारचे आवाज काढण्यात निपून आहे. लहान मुलाच्या रडण्यासारख्या आवाजापासून ते कारच्या हॉर्नपर्यंत असे विविध आवाज हा पक्षी काढतो.