वाचाल तर वाचाल… माध्यमिक शिक्षकाने पुस्तकांनी केली आईची तुला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लांजा

वाचाल तर वाचाल… हे आपण कित्तेकदा ऐकले आहे. परंतु आज तंत्रज्ञानाच्या युगामध्ये लोकांचा पुस्तक वाचणाकडील कल थोडा कमी होताना दिसत आहे. कारण आता सर्व काही इंटरनेटवर उपलब्ध असल्याने तरुणांची ओढ तिकडेच असते. परंतु यालाही काही अपवाद आहेत आणि पुस्तकांचे महत्त्व पटवून देण्यासाठी ते आपापल्यापरीन कार्यही करत असतात. अशी एक सुवर्णतुल्य घटना रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील लांजा मठे येथे घडली आहे. येथे एका माध्यमिक शिक्षकाने आईच्या वाढदिवशी तिची पुस्तकांनी तुला केली.

लांजा मठ येथील माध्यमिक शाळेवर शिक्षकपदावर कार्यरत असणारे संतोष कांबळे यांच्या मातोश्री इंदिरा कांबळे यांचा बुधवारी 85 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधून त्यांनी आईची पुस्तकांना तुला केली. माजी मंत्री रवींद्र माने यांच्या हस्ते ही तुला करण्यात आली. यावेळी शिवसेना आमदार राजन साळही हे देखील उपस्थित होते. तुला झाल्यानंतर ही पुस्तके येथील आश्रम शाळेला भेट देण्यात आली. कांबळे कुटुबीयांनी घेतलेल्या या आदर्शवत निर्णयाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

kamble1