”बर्थडे गर्ल” सिंधू इंडोनेशियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जकार्ता

हिंदुस्थानी रजतकन्या पी. व्ही. सिंधूने आज जकार्तात इंडोनेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मजल मारत आपला २३ वा वाढदिवस साजरा केला. सिंधूने आपल्या धडाकेबाज खेळाने जपानच्या आया ओहोरीचे आव्हान ३६ मिनिटांतच २१-१७,२१-१४ असे सहज संपुष्ठात आणले.

जागतिक तृतीय मानांकित सिंधूने गेल्या आठवड्यात मलेशियन ओपनमध्ये महिला एकेरीच्या उपांत्यफेरीपर्यंत मजल मारली होती. आता इंडोनेशियन ओपनच्या उपांत्य लढतीत तिची गाठ थायलंडची बुसानान किंवा चीनची हे बिन्गजियाओ यांच्यातील विजयी खेळाडूशी पडेल. सिंधूचा हा ओहोरीवरील ५ वा विजय आहे. एचएस प्रणॉय, सायना नेहवाल आणि समीर वर्मा या हिंदुस्थानी बॅडमिंटनपटूंचे सामने आज उशिरा खेळविण्यात येणार आहेत.