बिश्वजीत घोष यांच्या गाण्याच्या लाँचला सेलिब्रेटींनी आणली रंगत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

काही लोक फक्त प्रवास करतात, काही तो अर्ध्यावर सोडतात आणि काही असेही लोक असतात ज्यांना यशाची चटक असते. असाच एक बहुमुखी प्रतिभा असलेला गायक म्हणजे बिश्वजीत घोष. टी-सीरीझने जारी केलेले ‘सौ फिकर’ हे नवीन गाणे नुकतेच आपल्या भेटीस आले आहे. बिश्वजीत घोष यांचा आवाज ह्या गाण्याला लाभलेला असून मिस इंडिया वर्ल्ड आणि कमांडो आऊच आणि इय्यारी लीड अभिनेत्री पूजा चोप्रा आणि कुछ रंग प्यार के ऐसे भी फेम शाहीर शेख ही नवोदित जोडी आपल्याला ह्या गाण्याद्वारे दिसून येणार आहे.

‘सौ फिकर’ गाण्याबद्दल सांगताना बिश्वजीत घोष म्हणतात की, “संगीतकार रोहित सिंग दोन वर्षांपासून ह्या गाण्यावर काम करीत होते. अनेक गायकांनी आपल्या आवाजातील स्क्रॅचेस ह्यासाठी पाठवले परंतु ते काही त्याच्या पसंतीस उतरत नव्हते. जेव्हा मी हे गाणे ऐकला तेव्हा मी त्याच्या इतर एका गण्यासाठी प्लेबॅक करत होतो. हे गाणं ऐकताच माझ्या हृदयाला भिडलेलं. रोहितला देखील या गाण्यासाठी माझा आवाज आवडला आणि बाकीचं आता इतिहास जमा आहे.”

पुरस्कार, सन्मान आणि ओळख बिश्वजीत घोष यांना परकी नाही. एक यशस्वी उद्योजक, बिश्वजीत घोष २००९ मध्ये मध्य प्रदेश आयडोलचे विजेते होते. २०१२ मध्ये रेड एफएम कॉर्पोरेट क्लॅशचा सर्वोत्कृष्ट पुरुष सिंगर पुरस्कार, २०१० मध्ये एचटी म्युझिकल मुकाबलाचा सर्वोत्कृष्ट लाईव्ह परफॉर्मर अवॉर्ड, २०११ मध्ये ‘सुरतरंग’ या संगीत स्पर्धेचे विजेते पद आणि सलग ३ वर्षे व्हॉइस ऑफ भोपालचा मान पटकावला आहे. एकाधिक ऑडिओ आणि व्हिडिओ कव्हर गाणी तयार केल्यानंतर बिश्वजीत हा YouTube क्षेत्रातील एक प्रसिद्ध कलाकार आहे. प्लेबॅक गाण्याव्यतिरिक्त संपूर्ण भारतभर लाईव्ह परफॉर्मन्ससाठी बिश्वजीत प्रसिद्ध आहे. लवकरच बिश्वजीत एका अग्रगण्य संगीतकार आणि प्रोडक्शन हाऊससह सिंगल म्युजिक अल्बम आणि प्लेबॅक सॉंग आपल्यासमोर आणणार आहे.

टी-सीरीझच्या प्रवक्त्याने असे म्हटले आहे की, “आम्ही टी सीरीज नेहमीच योग्य आणि प्रतिभावान व्यक्तिमत्त्वाला प्रोत्साहित करत असतो. बिश्वजीत घोषची एक अद्वितीय आवाज रचना आहे. त्याचे गाणे आणि व्हिडिओ खूप चांगला आहे. आम्हाला वाटते की या तरुणाला प्रचंड क्षमता आहे आणि ‘सौ फिकर’ ही फक्त सुरुवात आहे! ” टी सिरीज ने म्युजिक लेबल दिलेले ‘सौ फिकर’ हे गाणे बिश्वजीत घोष यांनी गायले असून शब्बीर अहमद यांनी ते लिहिले आहे व रोहित सिंग यांनी ते संगीतबद्ध केलेले आहे. आरती एन राज यांनी या म्युजिक व्हिडीओचे दिग्दर्शन केलेले असून व्हिडिओमध्ये अभिनेत्री पुजा चोप्रा (इय्यारी आणि कमांडो फेम) आणि अभिनेता शाहीर शेख (कुछ रंग प्यार के ऐसे भी फेम) यांचा समावेश आहे. डी.ओ.पी. सुरेश बीसावेणी आहे असून फ्लेज एंटरटेनमेंटद्वारे याची निर्मिती करण्यात आली आहे.