भाजपची राज्यसभेसाठी 9 उमेदवारांची यादी जाहीर, महाराष्ट्रातील नावांची प्रतीक्षा, इच्छुकांचे जीव टांगणीला; राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना बिहारमधून संधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपने राज्यसभेसाठी 9 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना बिहारमधून संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभेतील संख्याबळानुसार राज्यातून भाजपच्या चार जागा निवडून येतील. मात्र यासाठी उमेदवारांच्या नावाची यादी अद्यापही प्रतीक्षेत असल्याने इच्छुकांचे जीव टांगणीला लागले आहेत.

महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी भाजपकडून राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, विजया रहाटकर, रावसाहेब दानवे, भागवत कराड, मिलिंद कांबळे, कुणाल पाटील, माधव भांडारी आदींच्या नावाची चर्चा आहे.

भाजपने पहिल्या यादीत प्रामुख्याने संघटनात्मक प्रभाव असलेल्या चेहऱ्यांना संधी दिल्याचे दिसत आहे. यामध्ये बिहार- नितीन नवीन, शिवेश कुमार, आसाम- तेराश गोवाला, जोगेन मोहन, छत्तीसगड  लक्ष्मी वर्मा, हरयाणा  संजय भाटिया, ओडिशा  मनमोहन सामल, सुजीत कुमार आणि पश्चिम बंगाल  राहुल सिन्हा यांच्या नावाचा समावेश आहे.