Video – कोणतेही बटन दाबा, भाजपलाच मत जाणार; भाजप उमेदवाराचा दावा

8550

सोमवारी 21 ऑक्टोबरला महाराष्ट्र व हरयाणामध्ये विधानसभा निवडणूकीचे मतदान होणार आहे. या निवडणूकीचा प्रचार शनिवारी संध्याकाळी संपला असून आता सर्वांना मतदानाची प्रतिक्षा आहे. मतदानाला अवघे काही तास उरलेले असतानाच भाजप उमेदवाराने ईव्हीएम मशीन हॅक केल्या असल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे.

निवडणूकीच्या प्रचारात अनेकदा विरोधकांकडून ईव्हीएम हॅक होत असल्याचा आरोप झाला.  हे आरोप भाजपने प्रत्येक वेळी फेटाळून लावले आहेत. मात्र आता भाजप उमेदवारांनेच विरोधकांच्या या आरोप खरे असल्याचं सिद्ध केलं आहे. हरयाणाचे उमेदवार बक्षिस सिंग विर्क यांनी शनिवारी प्रचार सभेदरम्यान ‘तुम्ही कोणतेही बट दाबा. पण मत हे भाजपलाच जाणार’ असे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी ईव्हीएम मशीनची तशी सेटिंगच केली असल्याचे देखील सांगितले.  त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण होणार आहे.

‘जर आता तुम्ही चुकलात तर या चुकीची शिक्षा पाच वर्ष भोगावी लागणार आहे. तुम्ही कुणाला मत दिलं आहे हे देखील आम्हाला कळणार आहे. मोदीजी आणि खट्टरजी यांच्या नजरा तेज आहेत. तुम्ही वोट कुठेही टाका पण मत कमळालाच जाणार. आम्ही मशीनमध्ये तशी सेटिंग केली आहे’, असे विर्क यांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या