भाजपमध्येही मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार; बिहारमध्ये भाजप, जदयुमध्ये शाब्दिक चकमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारमध्ये जदयु भाजपचे संयुक्त सरकार आहे. परंतु सध्या दोन्ही पक्षांमध्ये आलबेल दिसत नाही. काही दिवसांपूर्वी जदयु नेत्याने नितीश कुमार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतात असे वक्तत्य केले होते. आता भाजपनेही त्याला प्रत्युत्तर देत पक्षात बिहारच्या मुख्यमंत्रिपदासाठी उमेदवार असू शकतो असे वक्त्यव केले आहे.

बिहारमधील जनता दल (संयुक्त)चे नेते उपेंद्र कुशवाह म्हणाले की, देशात पंतप्रधान पदासाठी अनेक नेते आहेत. त्यात नितीश कुमारही आहेत. यावरून भाजप नेत्यांनी जदयुवर टीका करण्यास सुरूवात केली.

बिहार राज्य सरकारचे मंत्री आणि भाजप नेते सम्राट चौधरी म्हणाले की, पुढील 10 वर्षांसाठी पंतप्रधानपदासाठी कुठल्याही उमेदवाराची गरज नाही. त्यानंतर भाजप नेते अरविंड कुमार यांनी या वादात उडी घेतली. भाजपमध्येही मुख्यमंत्रिपदासाठी अनेक उमेदवार आहेत. जनतेच्या मतांवर नेते मुख्यमंत्री पंतप्रधान होतात. बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.