सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्याच्या हातात दिला भाजपचा झेंडा, नातवाने भाजपला फटकारले

2029

पश्चिम बंगालमधील नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या एका पुतळ्याच्या हातात भाजपचा झेंडा असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोवरून सुभाष चंद्र बोस यांचे नातू व भाजप नेते चंद्रा बोस हे संतापले असून त्यांनी स्वता:च्याच पक्षाला फटकारले आहे.

‘नेताजी सुभाष चंद्र बोस हे राजकीय व्यक्ती नव्हते. ते कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा मोठे होते. मला नाही वाटत आताच्या कोणत्याही पक्षात त्यांच्यासारखा महान व्यक्ती जाऊ शकते. त्यांच्या पुतळ्यावर पक्षाचा झेंडा लावून ते नेताजींना स्वत:चे बनवू शकत नाही. हे अत्यंत चुकीचे असून मी त्याचा निषेध करतो. भाजपचे राज्यातील अध्यक्ष दिलीप घोष यांनी या प्रकरणात लक्ष घालावे’, अशा शब्दात त्यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली आहे.

यावेळी त्यांनी CAA वरून देखील भाजपला घरचा आहेर दिला आहे. तसेच जर पक्षाने या कायद्यात बदल केला नाही तर ते पक्षाचा राजीनामा देतील असा इशाराही त्यांनी दिला आहे. ‘या कायद्यात काही बदल केले तर माझे त्याला समर्थन असेल. महात्मा गांधीजींना सांगितलं होतं की आपण शेजारी देशातील निर्वासितांना नागरिकत्व द्यायचं. पण त्यांनी कधी त्यात धर्माचा उल्लेख केला नव्हता. जर खरंच गांधीजींच्या पाऊलावर पाऊल ठेवायचे असेल तर आपण त्यांचे विचारही आत्मसाद करायला हवे’, असे बोस यांनी सांगितले.

 

आपली प्रतिक्रिया द्या