
‘भाजपाने हिंदूंना मुस्लिमांविरुध्द भडकावले. आता शीख बांधवांबद्दलही तसेच केले जात आहे. भाजपा पंजाबमध्ये धार्मिक वाद भडकावत आहे. नरेंद्र मोदी सरकार लोकांना धर्माच्या आधारावर विभागण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपा हीच देशातील खरी तुकडे-तुकडे गँग आहे.’ असा हल्लाबोल शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंग बादल यांनी भाजपावर केला.
नव्या कृषि कायद्याविरुध्द शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यावरून बादल यांनी भाजपावर मंगळवारी जोरदार टीका केली. भाजपाने राष्ट्रीय एकतेला तुकडय़ांमध्ये तोडले आहे असे ते म्हणाले. जय जवान, जय किसान असे आपण म्हणतो पण मंगळवारी जवान आणि शेतकरीही आंदोलनात सहभागी झाले आहेत. भाजपा सरकारने अहंकार बाजूला ठेवून आंदोलनकर्त्या शेतकऱयांशी चर्चा केली पाहिजे अशी मागणीही बादल यांनी केली.




























































