‘वीकेण्ड लॉकडाऊनमध्ये भाजप पदाधिकाऱ्य़ाने घेतली बॉक्सिंग निवड चाचणी, पोलिसांकडून कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘वीकेण्ड लॉकडाऊन’ असता नाही भाजपच्या पदाधिकाऱ्य़ाने बॉक्सिंग स्पर्धेची  निवड चाचणी घेण्याचा प्रकार आज नगर येथे घडला. तोफखाना पोलिसांनी या ठिकाणी जाऊन कारवाई करीत तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

नितीन शेलार, लखन शिंदे, महेंद्र कुसाळकर (सर्व रा. सावेडी, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सावेडी परिसरातील हुंडेकरी शोरूमच्या मागे बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड चाचणी स्पर्धा घेण्यात येत होती. या ठिकाणी 50 ते 60 जणांसह पंचही आलेले होते. याची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कारवाई केली.