भाजप नेत्या पंकजा मुंडे कोरोना पॉझिटिव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पंकजा मुंडे यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे. कोरोना संसर्ग झालेल्या अनेक रुग्णांच्या कुटुंबीयांची भेट घेतली असल्याने आपल्यालाही लागण झाली असल्याची शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. मी आधीच काळजी घेत असून विलगीकरणात आहे. मी अनेक लोकांना तसंच कोरोना रुग्णांच्या कुटुंबीयांची भेट घेतली असून त्याद्वारे संसर्ग झाला असावा. त्यामुळे माझ्यासोबत जे होते तसेच आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.