
मागील पाच वर्षांत विविध समाजासाठी आखलेल्या कल्याणकारी योजनांमुळे सामान्य माणसांचा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास वाढत आहे. यामुळे भाजपमध्ये येणार्यांची संख्या वाढली आहे. असे असले तरी प्रवेश करणार्या क्यक्तीचे कर्तृत्त्व पाहूनच त्यांना संधी दिली जाईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
भाजपाने केलेल्या कामांमुळे जनतेमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. आज विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि नेते यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा परिवारात सर्वांचे स्वागत… pic.twitter.com/QDSQkgiDcw
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) September 22, 2019
भाजपमध्ये आज विविध स्तरांतील व्यक्तींचा प्रवेश सोहळा पार पडला. या प्रवेशावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपच्या यशामुळे विरोधक धास्तावले आहेत. त्यामुळेच ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबद्दल विरोधक शंका घेऊ लागले आहेत. देशाच्या सुरक्षिततेसाठी योजलेल्या कडक उपाययोजनांमुळे जनतेला नरेंद्र मोदी यांचे नेतृत्क आणि भाजपविषयी विश्वास काटू लागला आहे, असे ते म्हणाले. याकेळी व्यासपीठाकर भाजपा प्रदेश सचिव नरेंद्र पवार, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
अहिल्यादेवी होळकर यांचे कंशज भूषणसिंह होळकर, माथाडी कामगार नेते अविनाश रामिष्टे, माजी आमदार संदेश कोंडविलकर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, माजी राज्यमंत्री बापूसाहेब थिटे यांचे पुत्र राजेंद्र थिटे, कल्याण महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते अनिल पंडित, मनसेचे दिनेश तावडे, मुंबई तेली साहू समाजाचे अध्यक्ष अशोक साहू, अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले, भाट समाजाचे अध्यक्ष भूषण गांगुर्डे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आज भाजपात प्रवेश केला.






























































