भाजप खासदाराचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

हाथरस लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजवीर दिलेर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. अलिगढ येथील वरुण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण त्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

राजवीर सिंह दिलेर गेला बराच काळ आजारी होते. 2019मध्ये लोकसभा निवडणूक जिंकून ते खासदार झाले होते. त्यांचे वडील किशन लाल दिलेर हाथरस मतदारसंघातून 1996 ते 2004 पर्यंत सतत चारवेळा खासदार झाले होते. त्यामुळे या पितापुत्रांचं हाथरस मतदारसंघाशी विशेष नातं होतं.

यंदा मात्र, राजवीर यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं नव्हतं. त्यांच्या ऐवजी हाथरस इथून अनूप वाल्मिकी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. इतका प्रबळ दावेदार असूनही त्यांचं तिकीट कापल्याने ते व्यथित झाल्याचं बोललं जात आहे.