हे तर आमचे ड्रायव्हर! भाजपने काढली केसरकरांची लायकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गद्दार आमदार दीपक केसरकर यांची भाजपने लायकीच काढली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पुत्र नीलेश यांनी केसरकरांना ड्रायव्हरच्या नोकरीची ऑफर दिली आहे.

सिंधुदुर्गातील राजकारणात नारायण राणे आणि दीपक केसरकर यांचे विळय़ा-भोपळय़ाचे नाते आहे. दोन दिवसांपूर्वी केसरकर यांनी नारायण राणे यांच्यावर आरोप करत खळबळ तर उडवून दिली होती, पण नंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी तंबी देताच ते बॅकफूटवर गेले. यानंतर भविष्यात राणेंचे नाव घेणार नाही, असे सांगतानाच राणेंसोबत काम करायला तयार असल्याचे केसरकर म्हणाले.

केसरकर काम करायला तयार आहेत म्हणताच राणेंचे पुत्र नीलेश यांनी तर केसरकरांची लायकीच काढली. नोकरी मागायची तर नीट मागा. 1 तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी आहे, अशी ‘ऑफर’च केसरकरांना दिली आहे. एवढी लायकी काढली तरी केसरकर चकार शब्द काढत नाहीत याबद्दल आता आश्चर्य व्यक्त होत आहे.