जमीन व्यवहारात मांडवली फिस्कटल्याने उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यातच भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मिंधे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड याच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी गणपत गायकवाडचा ड्रायव्हर रणजित यादव याला अटक केली आहे. ठाणे गुन्हे शाखेने रणजितला नगर येथून अटक केली. त्यानंतर त्याला उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणजित यादव हा गणपत गायकवाड यांच्याकडे गेल्या 10 वर्षापासून ड्रायव्हरचे काम करतोय. एफआयआरमध्ये रणजित यादव याचे नाव नव्हते, मात्र पोलिसांनी गोळीबारानंतरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता या घटनेनंतर त्याने वरिष्ठ निरीक्षकांच्या केबिनमध्ये प्रवेश केल्याचे दिसले. पोलिसांनी गणपत गायकवाड यांना अटक केल्यापासून रणजित गायब होता. अखेर शनिवारी सायंकाळी नगर जिल्ह्यातून त्याला अटक करण्यात आली.
View this post on Instagram
पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी गणपत गायकवाडसह संदीप सरवणकर, गणपतचा अंगरक्षक हर्षल केणे, गणपतचा मित्र विकी गणात्रा आणि आता ड्रायव्हर रणजित यादव अशा पाच जणांना अटक केली आहे. तर गणपतचा मुलगा वैभव याच्यासह अन्य दोघांचा शोध सुरू आहे.
गणपत गायकवाडचा कोठडीत अन्नत्याग, मिंधेंच्या दबावाने मुलावर गुन्हा दाखल केल्याचा आरोप