भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे ट्विटर अकाऊंट हॅक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रशिया-युक्रेन युद्धात हिंदुस्थाननेत तटस्थ राहण्याची भूमिका दर्शवली असताना, दोन्ही देशांचा उल्लेख करत हॅकर्सने भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे ट्विटर अकाऊंट हॅक केले आहे. विशेष म्हणजे काही वेळातच ‘सॉरी माझे अकाऊंट हॅक झाले’ असे ट्विट देखील हॅकर्सने केले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

हॅकर्सने जे.पी. नड्डा यांचे ट्विट खाते हॅक करून, त्यावरून रशिया आणि युक्रेन या देशांच्या मदतीसाठी आपण क्रिप्टोकरन्सीच्या रूपात मदत करणार असल्याचे म्हटले आहे. रशियाच्या पाठीशी उभे राहा, आता क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमात मदत स्वीकारली जाईल. तसेच बिटकॉइन आणि इथेरियम मदतदेखील स्वीकारली जाईल, असा संदेश हॅकर्सने नड्डा यांच्या ट्विट खात्यावरून केले आहे.

रशियाच्या क्रिप्टोकरन्सीच्या ट्विटनंतर हॅकर्सने पुन्हा एक ट्विट केल्याने खळबळ उडली आहे. हॅकर्सने आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, युक्रेनसोबत उभे राहा. क्रिप्टोकरन्सी दान करा. त्या पाठोपाठ ‘माझे अकाऊंट हॅक झाले नाही. सर्व दान युक्रेनच्या सरकारला दिले जाणार आहे’, असा संदेश या अकाऊंटवर हॅकरकडून पोस्ट करण्यात आला. नड्डा यांचे ट्विट अकाऊंट हॅक केल्यानंतर खळबळ उडाली होती. मात्र आता त्यांचे ट्विट अकाऊंट पूर्वव्रत करण्यात आले आहे.