
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
भाजप अध्यक्ष अमित शहा दिल्लीत बुधवारी गोव्यातील मित्रपक्षांच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. या भेटीत गोव्यातील राजकीय सद्यस्थितीवर शहा चर्चा करतील.
गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांनी राजीनामा दिले असून हे आमदार भाजप मध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे. दिल्लीत होणार्या बैठकीत गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अध्यक्ष सुदिन ढवळीकर सामील होतील. गोवा विधानसभेची सदस्य संख्या 40 असून त्यात काँग्रेसचे 16 आमदार आहेत. काँग्रेसच्या दोन आमदारांनी राजीनाम दिल्याने काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. दयानंद सोप्ते आणि सुभाष शिरोडकर यांनी आमदारकीसह पक्षाच्या सदस्यपदाचाही राजीनामा दिला आहे.


























































