Lok Sabha 2019 भाजप यंदा सर्वाधिक जागा लढवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सत्ताधारी पक्ष भाजप यंदा आपल्या संसदीय इतिहासात पहिल्यांदा सर्वाधिक जागा लढवणार आहे. 2019 च्या निवडणुकीसाठी पक्षाने आतापर्यंत 543 पैकी 408 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. 2014 साली पक्षाने 428 जागांवर उमेदवार उभे केले होते. यंदा पक्ष 438 ठिकाणी आपले उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या यंदा 30 उमेदवार अधिक उभे करण्याची माहिती दिली आहे.

2009 साली भाजपने 433, 2004 साली 364 तर 1999 साली 339 ठिकाणी उमेदवार उभे केल होते. 2019 साली सर्वाधिक म्हणजेच 438 उमेदवार उभे करण्याच्या तयारीत भाजप आहे. पक्षाने मित्रपक्षांना हाती घेतले आहे. आणि जनमत संघटित करण्यासाठी आपली पूर्ण शक्ति पणाला लावली आहे. ज्या राज्यात त्यांचे मित्र पक्षाची फार ताकद नव्हती त्यांच्याही शिडात हवा भरण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे.