
कॉर्डेलिया क्रूझ पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने क्लिन चिट दिल्यानंतर अडचणीत आलेले एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक वानखेडे यांची अखेर चेन्नईतील डीजीटीएसमध्ये बदली करण्यात आली आहे. याप्रकरणी समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकाकडून चूक झाल्याची कबुली एनसीबीचे डीजी एस.एन. प्रधान यांनी दिली होती. त्यानंतर वानखेडे यांच्यावर कारवाई होणार असे स्पष्ट झाले होते. वानखेडे यांची महसूल गुप्तचर संचालनालय करदाता सेवा संचालनालयाचे महासंचालक म्हणून ‘नॉन सेन्सिटीव्ह’ पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.


























































