पाकिस्तानात ईश्वरनिंदेच्या आरोपावरून 9 लाख वेबसाइट्स बंद

501

पाकिस्तानात ईशनिंदा आणि अश्लील साहित्य प्रसारित केल्याच्या आरोपाकरून 9 लाख वेबसाइटस् बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नॅशनल असेंब्ली स्टँडिंग कमिटी ऑन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड टेलिकॉमने दिलेल्या माहितीनुसार देशातील 9 लाख वेबसाइट्स बंद करण्यात आल्या आहेत.

या वेबसाइटस् बंद करण्यामागे अनेक कारणे देण्यात आली आहेत, ज्यात ईश्वरनिंदा, अश्लील साहित्य प्रसारित करणे, न्यायपालिका आणि सशस्त्र दलाविरोधात भावना भडकावणे आदी आरोप  आहेत. पाकिस्तान दूरसंचार प्राधिकरणाने समितीला सांगितले होते की, लोक अवैध साहित्याविरोधात तक्रारी करू शकतात. अली खान जादौन यांच्या अध्यक्षतेखालील समितीची बैठक झाली. यात राष्ट्रीय सूचना आणि प्रौद्योगिकी बोर्ड विधेयकास मंजुरी देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या