बंगळुरूत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये स्फोट; एका संशोधकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बंगळुरू

कर्नाटकची राजधानी बंगळुरूतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये झालेल्या स्फोटात एका संशोधकाचा मृत्यू झाला आहे. तर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास हाटड्रोजन सिलिंडरचा स्फोट झाल्याचे सांगण्यात आले. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. या संस्थेच्या ऐरोस्पेस इंजिनिअरिंग विभागाच्या हायपरसॉनिक अॅण्ड शॉक वेव रिसर्च लॅबमध्ये हा स्फोट झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या स्फोटाची तीव्रता एवढी होती की, 27 वर्षाचे संशोधक मनोजकुमार भिंतीवर फेकले गेले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांचे सहकारी अतुल्य कुमार, कार्तिक शेणॉय आणि नरेश कुमार गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटानंतर कुठेही आग लागल्याची घटना घडली नसल्याचे सांगण्यात आले. हे संशोधक सुपरवेव टेक्नोलॉजी नावाच्या एका स्टार्ट अप प्रयोगावर काम करत होते. विभागाचे प्राध्यापक के.पी.जे. रेटड्टी आणि जी. जगदीश यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रयोग सुरू होता. सदाशिव पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.