रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज ब्लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
railway-tracks-mumbai-local

सामना ऑनलाईन । मुंबई

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. यात मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा अप धिमा मार्ग, हार्बरवर कुर्ला ते वाशी दोन्ही मार्गांवर आणि पश्चिम रेल्वेवर माहीम ते गोरेगावदरम्यान अप व डाऊन, हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे मुख्य मार्गावर मुलुंड ते माटुंगा अप धिम्या मार्गावर सकाळी 11.10 ते दु. 3.40 वाजेपर्यंत ब्लॉक राहील. त्यामुळे मुलुंड ते माटुंगादरम्यान अप धिम्या मार्गावरील लोकल अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व लोकल मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, सायन या स्थानकांत थांबतील. सर्व मार्गांवरील लोकल उशिराने धावतील. तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दोन्ही मार्गावर सकाळी 11.10 ते दु. 3.40 वाजता ब्लॉक राहील. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी, बेलापूर, पनवेल दरम्यान दोन्ही मार्गांवरील लोकल फेऱ्या रद्द राहतील. या ब्लॉकमुळे पनवेल ते वाशी व कुर्ला ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान विशेष लोकल फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. या ब्लॉकमुळे मध्य रेल्वे मुख्य मार्गावरील आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्या पंधरा मिनिटे उशिराने धावण्याची शक्यता असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.