
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत महानगरपालिका निवडणुकांची घोषणा केली. 29 महानगरपालिकांसाठी 3 कोटी 48 लाख मतदार 15 जानेवारी 2026 रोजी मतदान करतील, तर 16 जानेवारी रोजी निकाल लागतील. मुंबई, ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगरसह एकूण 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक होणार असून या महानगरपालिकांमध्ये किती नगरसवेक आहेत, तसेच अ, ब, क आणि ड वर्गातील महानगरपालिकांसाठीचा खर्च कसा वेगळा आहे याबाबत जाणून घेऊया…
कोणत्या महापालिकेत किती नगरसेवक
1. बृहन्मुंबई – 227, श्रेणी – अ+
2. भिवंडी-निजामपूर – 90, श्रेणी – ड
3. नागपूर – 151, श्रेणी – अ
4. पुणे – 162, श्रेणी – अ
5. ठाणे – 131, श्रेणी – ब
6. अहिल्यानगर – 68
7. नाशिक – 122, श्रेणी – ब
8. पिंपरी-चिंचवड – 128, श्रेणी – ब
9. छत्रपती संभाजीनगर – 113, श्रेणी – क
10. वसई-विरार – 115, श्रेणी – क
11. कल्याण-डोंबिवली – 122, श्रेणी – क
12. नवी मुंबई – 111, श्रेणी – ड
13. अकोला – 80, श्रेणी – ड
14. अमरावती – 87, श्रेणी – ड
15. लातूर – 70, श्रेणी – ड
16. नांदेड-वाघाळा – 81, श्रेणी – ड
17. मीरा-भाईंदर – 96, श्रेणी – ड
18. उल्हासनगर – 78, श्रेणी – ड
19. चंद्रपूर – 66, श्रेणी – ड
20. धुळे – 74, श्रेणी – ड
21. जळगाव – 75, श्रेणी – ड
22. मालेगाव – 84, श्रेणी – ड
23. कोल्हापूर – 92, श्रेणी – ड
24. सांगली-मिरज-कुपवाड – 78, श्रेणी – ड
25. सोलापूर – 113, श्रेणी – ड
26. इचलकरंजी – 76, श्रेणी – ड
27. जालना – 65, श्रेणी – ड
28. पनवेल – 78, श्रेणी – ड
29. परभणी – 65, श्रेणी – ड
खर्चाची मर्यादा –
बीएमसीसारख्या अ वर्गातील महानगरपालिकांसाठी निवडणूक खर्च 15 लाख. ब वर्गातील महानगरपालिकांसाठी 13 लाख, क वर्गातील महानगरपालिकांसाठी 11 लाख आणि ड वर्गातील महानगरपालिकांसाठी 9 लाख खर्च मर्यादा असणार आहे.
महानगरपालिका निवडणुकांची घोषणा; 15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला निकाल
वाचा सविस्तर – https://t.co/RpWWYc7EYG pic.twitter.com/02ww4UQGrS
— Saamana Online (@SaamanaOnline) December 15, 2025




























































