BMC Budget 2026 – सत्तेत येताच मुंबईकरांच्या मुदतठेवींवर महायुतीचा डल्ला! 36 हजार 623 कोटी 09 लाखांच्या ठेवी मोडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प बुधवारी सादर झाला आहे. आता मुंबई महापालिका मुदत ठेवी मोडण्याचा तयारीत आहे. मुंबई महापालिकेच्या एकूण ठेवी 81 हजार 449 कोटी 32 लाख रुपये शिल्लक आहेत. त्यापैकी 44 हजार 826 कोटी 23 लाख रुपये बांधील दैतवापोटी राखीव असल्यामुळे त्या पालिकेला तोडता येणार नाहीत. मात्र उर्वरित 36 हजार 623 कोटी 09 लाख रुपये पालिका वेगवेगळ्या प्रकल्पासाठी वापरणार असल्याचं अर्थसंकल्पातून स्पष्ट झालं आहे.

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 80952.56 कोटी इतका असणार आहे. 2025-26 च्या तुलनेत यंदा 8.77% नं वाढ यंदाच्या अर्थसंकल्पात केलेली आहे. 2025-26 चा अर्थसंकल्प 74427.41 इतका अंदाजे अर्थसंकल्प होता. मागच्या वर्षीपेक्षा यंदा 6,525 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 4 वर्षांनंतर नव्या सत्ताधाऱ्यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. महापालिकेच्या मुदतठेवी महायुती मोडणार असल्याचं अर्थसंकल्पातून स्पष्ट करण्यात आलं आहे. एकूण 81 हजार 449 कोटी 32 लाख रुपयांच्या ठेवी शिल्लक आहेत. त्यापैकी 36 हजार 623 कोटी 09 लाख रुपये पालिका वेगवेगळ्या प्रकल्पासाठी वापरणार असल्याचं अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आलं आहे.

मुंबई महापालिका अर्थसंकल्पातील मोठे मुद्दे
मुंबई महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प 80952.56 कोटींचा
मागच्या वर्षीपेक्षा (74,427 कोटी) यंदा 6,525 कोटी रुपयांची वाढ
BMC यंदा 81 हजार कोटींपैकी 36 हजार 623 कोटींच्या ठेवी मोडणार
BMC आरोग्य खात्यासाठी 7 हजार 456 कोटींची तरतूद
बेस्ट साठी 1 हजार कोटींची तरतूद
फेरीवाल्यांना QR Code आधारित प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरु
ऑक्टोबरपासून करमणूक कर लागू होणार
वर्सोवा दहिसर कोस्टल रोडसाठी 4 हजार कोटींची तरतूद
गोरेगाव मुलुंड लिंक रोड 2 हजार 650 कोटींची तरतूद
मनपा रुग्णालयांसाठी 1 हजार 62 कोटींची तरतूद
40 बाय 40 पेक्षा मोठ्या जाहिरात फलकांना बंदी;
पदपथ आणि गच्चीवरील जाहिरातींनाही मनाई
राज्य शासनाकडे बीएमसीचे एकूण 10,948.58 कोटींची थकबाकी