
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुधार समिती अध्यक्ष पदासाठी (2021-22) आज (दिनांक 6 एप्रिल 2021) पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेचे सदानंद परब हे 13 मते मिळवून विजयी झाले आहेत. परब यांनी सलग तिसऱ्यांदा सुधार समिती अध्यक्ष होण्याचा बहुमान संपादन केला आहे.
महानगरपालिका मुख्यालयातील सभागृहात झालेल्या या निवडणुकीमध्ये परब यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार श्रीमती स्वप्ना विरेंद्र म्हात्रे (भाजप) यांना 10 मते मिळाली. एकूण 26 सदस्यांपैकी २३ सदस्यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. तर तीन जण तटस्थ राहिले. मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी किशोर पेडणेकर यांनी पीठासन अधिकारी म्हणून कामकाज सांभाळले.
तत्पूर्वी, अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीत काँग्रेसच्या आजमी मोहम्मद अश्रफ मोहम्मद अस्लम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.






























































