कोरोना वाढतोय! अशा प्रकारे घ्या काळजी, पालिकेने जारी केल्या सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपण सर्वजण गेले वर्षभर कोरोना विरोधाची लढाई लढत आहोत. दोन महिन्यापासून आपल्या मदतीला लसही आलेली आहे. परंतु यामुळे लगेच दिलासा मिळेलच असे नाही. तथापि, विविध कारणांमुळे आपल्यापैकी अनेकांच्या दैनंदिन व्यवहारात ‘कोरोना’ प्रतिबंधाबाबत शिथिलता आलेली दिसते. मुंबईत त्याचे दुर्दैवी परिणाम दिसायला लागले आहेत. रुग्ण संख्या ही पूर्वीपेक्षा तिप्पट होत आलेली आहे. शासनाच्या मदतीने बृहन्मुंबई महापालिका या संकटाला सामोर जाण्यासाठी पुन्हा समर्पित झालेली आहे. परंतु यात मुंबईकर नागरिकांचे पूर्वी प्रमाणे सक्रिय सहकार्य मिळाले, तरच या संकटावर पुन्हा नियंत्रण आणणे शक्य आहे. कारण यावर नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबईकरांना आज अधिकाधिक स्वयंशिस्तीची गरज आहे. मुंबईकर यात कुठेही कमी पडणार नाही, असा विश्वास बृहन्मुंबई महानगरपालिकेस आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने मागील वर्षभरात 41 लाख 74 हजार 259 नागरिकांची कोरोना चाचणी केलेली आहे. तसेच 53 लाख 52 हजार 521 लोकांचे विलगीकरण केलेले आहे. महापालिकेने दररोज 1 लाख नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवले असून आतापर्यंत 12 लाख 60 हजार 387 नागरिकांचे लसीकरण केले आहे. तर 2 वेळा सुमारे 35 लाख मुंबईकर नागरिकांच्या कुटुंबाच्या घरी जाऊन तपासणीसह कोरांना विरोधाच्या लढाई विषयीजागृती आणि माहिती गोळा केलेली आहे.

‘कोरोना’ या संसर्गावर प्रतिबंधात्मक औषध उपचार आणि हमखास असा तोडगा सापडून कोरोनावर संपूर्ण नियंत्रण येईपर्यंत, आपल्या सर्वांमध्ये आलेली जीवन शैलीमधील शिथिलता आता बदलून नव्याने काही बदल करणे सर्वांनाच आवश्याक झाले आहे. तोंडावर मास्कोचा नियमित वापर, सुरक्षित शारीरिक अंतर, वारंवार साबणाने हात धुणे नि निर्जंतुकीकरणाचा वापर याच्याळपलीकडे जाऊन आता वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सार्वजनिक आयुष्या्त नवीन बदलांचा अवलंब करणे अत्यंत आवश्यीक झाले आहे. अशा बदलांचा स्वीवकार करुन, या माध्यचमातून कोरोनावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनात राज्यभरात कृती आराखड्यांची अंमलबजावणी सुरू आहे.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या जाणीव-जागृती मोहिमा या राज्यिव्याहपी मोहिमांचा एक भाग आहे. मुंबईकर नागरिकांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने व स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने राबविण्यात येणा-या या मोहिमेत प्रभावी कोविड नियंत्रणासाठी नवीन जीवनशैली पद्धतीचा अवलंब करण्यास अधिकाधिक व्यक्तींना प्रेरित करणे, हा या दोन्ही मोहिमांचा मुख्यै भाग आहे. कोविड नियंत्रणासाठी अधिक प्रभावी आरोग्य शिक्षण साधणे, हे त्याहचे मुख्यं उद्दिष्ट आहे.

मागील वर्षापासून बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोरोना नियंत्रणासाठी अनेक उपाय योजना राबविल्या आहेत. तसेच विविध स्तरीय जाणीवजागृती सह अनेक धोरणात्मक निर्णय घेतलेले आहेत. मात्र जगात या संसर्गजन्य आजारावर तात्काळ तोडगा असणारे औषध अद्यापही आलेले नाही. कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांनी आता नव्या जोमाने स्वतःहून काही गोष्टी अंगीकारणे गरजेचे असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले आहे.

नागरिकांना कोविड नियंत्रणासाठी कोरोनासोबत नव्याने आणि नव्या जीवन शैलीसह जगायला शिकणे, ही आजची गरज असून यासाठी काही नियम आणि मार्गदर्शक सूचना नागरिकांनी अंगिकारणे आवश्यकक झाले आहे. या वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सार्वजनिक जीवनात प्रतिबंधात्मक खबरदारी घेण्याबाबत परिणामकारक अशी अत्यंत आवश्यवक त्रिसूत्री पुढीलप्रमाणे आहे:

1)  मास्क’ चा कटाक्षाने नियमितपणे व योग्य वापर करणे

2) नागरिकांनी आपापसात किमान 2 मीटरचे सुरक्षित अंतर ठेवणे.

3) वारंवार साबणाने हात स्वच्छ धुणे. तसेच निर्जंतुकीकरण द्राव्यावचा अर्थात ‘सॅनिटायझर’ चा योग्य रित्यां वापर करणे

या अत्यंत महत्त्वाच्या त्रिसूत्री प्रत्येयकाने पाळल्याचच पाहिजेत.
…
कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून पूर्वी आपण घरात, सार्वजनिक ठिकाणी, आपल्या सोसायटीत, कार्यालयात, बाजारात, फिरताना, बोलताना जी काळजी घ्यायचो, तशी काटेकोरपणे काळजी घेण्याची आज खूप गरज आहे. या सर्व ठिकाणी वावरताना काय काय प्रतिबंधात्मक काळजी घ्यावी; याबाबतच्या सूचना पुन्हा आपल्या माहितीसाठी देत आहोत.

अ) वैयक्तिक स्त्तरावर

• रोज सकाळी शरीराचे तापमान, ऑक्सिजन पातळी मोजून घ्यावी. हे आरोग्य व्यवस्थापनासाठी आवश्यक आहे.

• मास्कचा सदैव उपयोग करावा. मास्क् काढून ठेवू नये. नाकाखाली/चेह-याखाली मास्का न ठेवता सुयोग्यय प्रकारे लावावा. याबाबत कुटुंबातील सदस्यांजनी एकमेकांविषयी काळजी घ्या-वी.

• चेह-याला तसेच मास्करला वारंवार हात लावू नये.

• एकदाच वापरात येणारे मास्कल (सिंगल यूज मास्क्) वापरुन झाल्यायनंतर ते टाकून देण्यावपूर्वी, त्यावर निर्जंतुकीकरण द्राव्य (सॅनिटायझर) शिंपडून, त्यांाचे तुकडे करुन नंतर टाकावेत. जेणेकरुन त्यांकचा पुन्हाव वापर करण्यारसाठी गैरउपयोग केला जाणार नाही.

• सॅनिटायझरची लहान बाटली सातत्यााने सोबत बाळगावी. त्या चा गरजेनुसार उपयोग करत रहावा.

• हातांची नियमितपणे स्वलच्छ्ता राखावी. साबणाने हात वारंवार स्वाच्छ धुवावेत. हात धुण्यासाठी सॅनीटायझर व साबण असे दोन्ही पर्याय उपलब्ध असल्याास साबणाने हात धुण्यास प्राधान्य द्यावे.

• स्वच्छ हातरुमाल बाळगावा. सर्दी, खोकला असल्याीस स्वणच्छह मास्कप, रुमाल यांचा सातत्यातने उपयोग करावा.

• कुटुंबातील सदस्यांचनी शक्य्तो वेगवेगळ्या स्व्रुपाचे किंवा वेगवेगळ्या रंगाचे ‍मास्क वापरावे अथवा प्रत्येकाने आपल्या मास्काला वेगळी स्वतंत्र खूण करावी. जेणेकरुन प्रत्येवकाचा मास्कन ओळखला जाईल. एकमेकांचे मास्कप वापरु नये.

• कोणाशीही बोलत असताना एकमेकांच्या चेह-याकडे थेटपणे बघू नये

• जेवताना एकाच भांड्यात किंवा पातेल्यात पदार्थ घेण्याऐवजी ते आवश्यकतेनुसार एकदाच ताटात घ्यावेत.

• जेवताना मौन ठेवावे किंवा कमीत कमी बोलावे. तसेच शक्य असल्यास जेवण करताना समोरासमोर बसू नये.

• जेवणात पालेभाज्यांचा वापर अधिक करावा. जीवनसत्वव, प्रथिने अशा सर्व पोषक बाबींनी युक्त पदार्थ असावेत.

• पुरेसा व योग्येवेळ आहार, पुरेशी झोप, व्यातयाम – योग – प्राणायाम आदीद्वारे प्रतिकारशक्ती टिकवून ठेवावी.

• कोणतेही वाहन चालवताना, वाहनांतून प्रवास करतानाही मास्कसचा वापर करणे आवश्य्क आहे. कारण वाहन थांबवून वाहतूक पोलीस किंवा इतरांशी बोलताना नकळत मास्क नसल्यास संसर्गाचा धोका पोहोचतो.

• बंदिस्त वातावरण टाळावे. याचप्रमाणे गर्दीत जाणे किंवा निकटचा संपर्कही टाळावा. तसेच वातानुकूलन यंत्रणेचा वापर शक्यतो टाळावा.

• अरुंद ठिकाणी जास्त वेळ थांबू नये.

• चालायला-धावायला गेल्यानंतर त्या ठिकाणी कमीत कमी व्यक्ती व सुरक्षित अंतरावर असतील, असे पहावे.

• सार्वजनिक ठिकाणी वावरताना थुंकू नये.

• दरवेळी बाहेरून/कार्यालयातून घरी परतल्यारवर सर्वप्रथम आंघोळ करावी व कपडे धुण्यायसाठी थेट एका बादलीमध्येव टाकावेत.

• बाहेरून आलेल्या व्यक्ती घरात प्रवेश केल्यानंतर थेट स्नानगृहात जाताना ज्या ज्या ठिकाणावरून चालत गेली असेल, ती जागा प्रथम साबणाच्या पाण्याने पुसून घ्यावी. त्यानंतर केवळ पाण्याने भिजवलेल्या ओल्या फडक्याने व नंतर कोरड्या फडक्याने पुसून कोरडी करावी

• कोविड विषाणूचा अधिक प्रादुर्भाव असणा-या परिसरांना/शहरांना/राज्यांरना/ देशांना भेट देणे टाळावे.

• जर ‘कोविड – 19′ ची लक्षणे असतील, तर आपण कुठे-कुठे गेलो होतो आणि कोणा-कोणाला भेटलो, ते आठवावे. शक्यकतोवर भेटीच्या’ नोंदी ठेवाव्यालत.

• शक्यतो बाहेर जाणार्याभ व्यक्तीने सकाळी आणि सायंकाळी कोमट पाणी पिणे आणि गरम वाफ घेणे योग्य राहील.

• शक्यतो घरचे खाणे व घरचे पाणी पिणे यास प्राधान्य द्यावे. घराबाहेर पडताना आपल्या घरच्या पिण्याच्या पाण्याने भरलेली बाटली सोबत ठेवावी. जास्त वेळ बाहेर राहणार असल्यास घरूनच जेवणाचा डबा सोबत घेऊन निघावे. घरी परतल्यावर ही पाण्याची बाटली किंवा जेवणाचा डबा साबणाच्या द्रावणाने नीट धूवून व पुसून घ्यावा.

ब) कौटुंबिक स्ततरावर

• कुटुंबात वावरताना, कोरोनाविषयक मार्गदर्शक तत्वांाव चे, सुचनांचे अनावधानाने कोणाकडून उल्लंाघन होत असल्यािस, ते एकमेकांच्याा लक्षात आणून द्यावे.

• ऑक्सिजनची पातळी मोजण्यावसाठी आवश्याक असलेले उपकरण (ऑक्सिमीटर) सदैव बाळगावे. कुटुंबातील प्रत्येयक सदस्यानची प्राणवायू पातळी ठराविक कालावधीने तपासून त्यांंच्याव अचूक नोंदी ठेवाव्यापत.

• शारीरिक तापमापक (थर्मामीटर) / थर्मल स्क्री्निंग गन घरात असावी व त्याचा नियमितपणे सुयोग्यय वापर करावाा.

• घरातील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्यार प्रकृतीमानाकडे विशेष लक्ष पुरवावे.

• घरातील ज्याक सदस्यांना सहव्याकधी (को-मॉर्बिडीटी) असतील, ते नियमितपणे औषधोपचार घेत असल्याची व ‍त्यांची प्रतिकारशक्ती टिकून राहील, याची काळजी घ्याावी.

• कुटुंबात एकत्र सोबतीने जेवायला बसताना समोरासमोर न बसता एका बाजूला एक याप्रमाणे बसावे.

• शक्यंतो घरातील एकाच सदस्याषने कौटुंबिक कामांसाठी बाहेर ये-जा करावी व त्याब सदस्यातने अशी ये-जा करताना संपूर्ण दक्षता घ्यायवी.

• घरातील प्रत्येक सदस्यावने दररोज स्वच्छ कपडे परिधान करावेत. न धुता कपड्यांचा पुन्हा वापर करु नये.

• भ्रमणध्वननी सारख्या वैयक्तिक वापराच्या् वस्तूस कुटुंबातील सदस्यांवनी एकमेकाकडे घेऊन/अदलाबदली करुन वापरु नयेत. अशा वस्तूलदेखील योग्य स्वच्छ राहतील, याची काळजी घेणे आवश्याक आहे. शक्य असल्याास बाहेर जाताना भ्रमणध्वनीवर प्लास्टिकचे पारदर्शक आच्छादन वापरावे व घरी परतल्यावर प्लास्टिकच्या आवरणास साबण लावून धुण्यास टाकावे.

• खाद्यपदार्थांचे पार्सल मागवले असल्यालस ते स्वकयंपाकगृहात खूप वेळ राखून ठेवू नये. पदार्थ काढून झाल्याानंतर आवरण, डबे आदींची तातडीने विल्हेकवाट लावावी.

• बाजारातून आणलेल्या भाज्या, फळे आदी स्वतच्छह धुवून ठेवावेत. नंतरच त्याीचा आहारात समावेश करावा.

• ऑनलाईन/बाहेरुन पार्सल मागवले असल्यास, नाशवंत पदार्थ नसतील तर किमान एक दिवस ते पार्सल तसेच ठेवून द्यावे. त्याच्या आवरणावर निर्जंतुकीकरण द्रव्य फवारावे. दुस-या दिवशी ते उघडावे.

• घरातील फरशी, स्वायंपाकगृह, प्रसाधनगृहे, इतर वापराच्याय वस्तू यांची नियमितपणे योग्य अशा निर्जंतुकीकरण द्रव्याचा उपयोग करुन स्वच्छता करावी.

• भारतीय बनावटीचे शौचालय असल्यायस ते व्यवस्थित स्वच्छ राखावे. पाश्चात्य बनावटीच्यात शौचालयातील भांड्यावरील झाकण ‘फ्लश’ करताना बंद ठेवावे.

• नातेवाईक – मित्र इत्यादींकडे जाणे टाळावे. त्याऐवजी ऑनलाइन पद्धतीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एकमेकांशी संवाद साधण्यास प्राधान्य द्यावे.

• कौटुंबिक समारंभ, पार्टी यांचे आयोजन करुच नये. निमंत्रित करणे अपरिहार्य असल्यानस सरकारने ठरवून दिलेल्या मर्यादेतच निमंत्रण द्यावे आण‍ि अशा ठिकाणी आवश्यपक त्या‍ सर्व उपाययोजना कराव्या्त.
….

क) सोसायटी/वसाहतींमध्येम घ्यावयाची काळजी

• सोसायटी/वसाहतीमध्येम वावरताना प्रत्येयकाने मास्कव घालणे बंधनकारक आहे. या नियमाचेे परिपूर्ण पालन होत असल्याची खातरजमा सोसायटीतील सर्वांनी नियमितपणे करावी.

• घराबाहेर पडताना प्रत्येतकाने सॅनिटायझर, मास्क व हातमोज्यांचा योग्यकरित्याा वापर करुन बाहेर पडावे.

• सोसायटीतील लहान मुले, ज्येयष्ठा नागरिक हे घराबाहेर विनाकारण जाणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे.

• सोसायटी/वसाहतीमध्येम दोन व्येक्तींनमध्ये‍ किमान सहा फूट अंतर राखूनच संवाद साधावाा.

• सोसायटींमधील प्रतीक्षागृहाचा शक्यजतो उपयोग करु नये. ते बंदच ठेवावे.

• सोसायटीत दरवाज्याीचा कडीकोयंडा, कठडे (हॅण्ड् रेलिंग), लिफ्ट, बाक, वाहनतळ अशा विविध ठिकाणी कुठेही हात लावणे शक्य्तो टाळावे.

• सोसायटीतील उद्वाहन (लिफ्ट) चा उपयोग करताना हातात कागद ठेवावा. लिफ्टची बटणे दाबताना कागदी कपट्यांचा उपयोग करावा. असे कागदी तुकडे वापरानंतर लगेच काळजीपूर्वक कच-याच्याण डब्याीत टाकावेत.

• सोसायटीतून/वसाहतीतून पुन्हाफ घरात येताच कुठेही स्पिर्श न करता सर्वात आधी साबणाने हात स्वयच्छू धुवावेत.

• सोसायटीमध्ये‍ किंवा परिसरात बाहेरील कोणत्याही व्यक्तिला शक्यतो थेट प्रवेश देऊ नये.

• बाहेरुन येणारे मदतनीस, वाहन चालक, कचरा संकलक, सफाई कर्मचारी यांच्या्साठी शारीरिक तापमान तपासणी, प्राणवायू तपासणी, हात स्वेच्छक धुण्यािची सोय आदी बाबी उपलब्धण असल्याबची खातरजमा करावी.

• ऑनलाईन पार्सल मागवल्या,नंतर, सोसायटीमध्ये‍ ते थेट घरात न मागवता, सोसायटीच्या् प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकाकडे / सुरक्षित अशा एकाच ठ‍िकाणी ठेवण्याणची व्यईवस्थाा करावी. तेथून निर्जंतुकीकरण करुन ते घरात न्यामवे. शक्य असल्यारस काही तास ते पार्सल खुल्याण जागेत/ राहू द्यावे आण‍ि नंतर घरात न्याधवे.

• सोसायटीतून बाहेर पडताना वाहनांना स्पेर्श करण्यासपूर्वी त्यांोचे निर्जंतुकीकरण करावे.

• नजीकचे महापालिका आरोग्य केंद्र, रुग्णालय, विभागस्तरीय नियंत्रण कक्ष (वॉर्ड वॉर रुम), आदी महत्वासा चे संपर्क क्रमांक इत्यादी ठळकपणे दिसतील अशारितीने सोसायटी परिसरात प्रदर्शित करावे.
…

ड) दुकाने / मंडया / ‍मॉल्समध्ये खरेदीसाठी जाताना

1) बाजारपेठेत खरेदीला जाताना घरातील एकाच व्यक्तीने जावे. तसेच कमी गर्दीच्या वेळी जावे.

2) दुकानांबाहेर तसेच आतमध्येाही इतरांपासून सुरक्षित अंतर राखूनच वावर होईल, याची काळजी घ्या)वी. गर्दी असल्यामस तिथे प्रवेश करु नये. लिफ्टऐवजी शक्य तो जिन्यांीचा वापर करावा. कठड्यांना स्पार्श करु नये.

3) खरेदीला गेल्यानंतर तेथे प्रदर्शनार्थ ठेवलेल्या वस्तूंना स्पर्श करणे टाळावे.

4) खरेदीसाठी प्राधान्याने ऑनलाइन पद्धतींचा वापर करणे.

5) खरेदी करुन आणलेल्या वस्तूी काही काळ घराबाहेर / मोकळ्या जागेत / जिथे कोणाचाही स्पार्श होणार नाही, अशा ठिकाणी ठेवाव्यावत.

6) दुकानदार/व्या वसायिक यांनी मास्का न लावलेल्याय ग्रा‍हकांना प्रवेश देऊ नये.

7) दुकाने/मंडया/संकूल येथे सुरक्षित अंतराच्याा खुणा करुन मर्यादीत ग्राहकांनाच एकापाठोपाठ प्रवेश द्यावा.

8) दुकानात प्रवेश करणाऱया प्रत्येककासाठी शारीरिक तपमान, सॅनिटायझर यांची व्यावस्थां करावी.

9) दुकाने/मंडया/संकूल येथे मर्यादीत संख्ये्नेच नोकर/मदतनीस यांची नियुक्तीह करावी.

10) व्यरवहारांसाठी शक्ययतो ऑनलाईन/ड‍िजीटल पद्धतींचा अवलंब करावा. कमीत कमी चलन हाताळावे लागेल, याची काळजी घेतल्यातस संसर्गाचा धोका कमी करता येतो.
..

इ) कार्यस्थलळी/कार्यालयांमध्येे घ्या वयाची खबरदारी

1) कार्यालय प्रमुखांनी सर्व कर्मचा-यांमध्येय सुरक्षित अंतर राहील, याप्रमाणे कामकाजाची रचना करावी.

2) शक्ययतो आळीपाळीने व गरजेनुसार कर्मचा-यांना कार्यालयात बोलवावे. कामकाजाच्याण वेळा विभागून द्याव्या त.

3) कार्यालयांमध्येन शारीरिक तापमान, प्राणवायू पातळी आदींची तपासणी, निर्जंतुकीकरण द्रव्या यांची संयंत्रे सर्वांसाठी उपलब्धी असावीत.

4) बैठकांसाठी दूर-दृश्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) पद्धत उपयोगात आणावी.

5) कामकाजामध्येठ शक्यय तितका मानवी संपर्क कमी करुन डिजीटल पद्धतींचा उपयोग करावा.

6) कार्यालयाची हवा कायम खेळती राहण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवणे. वातानुकूलन यंत्रणेचा वापर टाळावा.

7) आत्यंातिक गरज नसल्याेस, कार्यालयीन कामकाजविषयक दौरे टाळावेत.

8) कर्मचा-यांनीदेखील शक्ययतो घरून काम करण्यास प्राधान्य द्यावे. (वर्क फ्रॉम होम).

9) शक्य असेल त्यांनी कामावर जाताना दुचाकीने, सायकलीने जाणे किंवा पायी चालत जाणे योग्य.

10) कमी गर्दीच्या वेळी प्रवास करावा.

11) कार्यालयात मास्कनचा उपयोग, सुरक्षित अंतरावर बैठक व्येवस्थात, सॅनिटायझरचा वापर, वारंवार हात स्वाच्छक धुणे या बाबींकडे आवर्जून लक्ष द्यावे.

12) कार्यालयात बैठकीत सहभागी असल्यारस, त्याददरम्यान ‘फेस मास्क’ चा वापर करणे. सुरक्षित अंतरावर बसावे.

13) येणा-या अभ्याागतांशी संवाद साधताना सुरक्षित अंतर राखून संवाद साधावा.

14) आपल्यालसमवेत इतर सहका-यांनीही शारीरिक तापमान, प्राणवायू पातळी इत्याादी मोजली आहे किंवा नाही, याची त्यांतना आठवण करुन द्यावी.

15) कार्यालयात शक्यततो एकत्रित जेवायला बसू नये.

16) कार्यालयांमध्येी लिफ्टचा कमीतकमी उपयोग करावा. लिफ्टमध्येन मोजक्या्च व्यक्तींनी व एकमेकांच्या विरुद्ध दिशेला उभे राहून उपयोग करावा. लिफ्टच्या बटनांचा उपयोग करताना कागदी तुकड्यांचा उपयोग करावा.

17) शक्य असेल तेथे लिफ्टमध्ये फूट ऑपरेटेड बटने बसवून घ्यावीत.

फ) खासगी/सार्वजनिकरित्याय प्रवास करताना घ्या वयाची दक्षता

1) सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करत असताना मौन राखावे. सहप्रवाशांशी विनाकारण बोलू नये.

2) मास्क समवेत फेसशिल्डसचाही उपयोग केल्यारस उत्तमम.

3) सार्वजनिक वाहनात पुरेशा रिकाम्या जागा उपलब्ध असल्यास एका आसनावर एकाच व्याक्तीोने आसनस्था व्हा वे.

4) वाहनांमध्येा गर्दी करुन, दाटीवाटीने प्रवास करु नये. असा प्रवास टाळणे उत्तीम.

5) वाहनांमध्येा दरवाजा, कठडा यांना शक्यपतो स्प्र्श करु नये. स्पर्श करावा लागणार असल्यारस त्या आधी व वाहनातून उतरल्याानंतरही सॅनिटायझर हातांना लावावे.

या सर्व बाबी आता नव्याने जीवनशैलीचा भाग म्हवणून अंगीकारणे अतिशय गरजेचे आहे. जोवर कोविड विषाणूवर परिपूर्ण नियंत्रण येत नाही, तोपर्यंत नागरिकांनी या सर्व बाबींचे पालन करुन या साथरोगावर प्रभावी नियंत्रण ‍मिळविण्यासाठी शासनाला आणि महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्तर इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले आहे.