भुयारी मेट्रो आज मध्यरात्रीपर्यंत धावणार

मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुयारी मेट्रोची (मेट्रो-3) सेवा गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत चालवण्यात येणार आहे. मतदानासाठी प्रक्रियेसाठी शहरात विविध मतदान केंद्रांवर तैनात असलेल्या अधिकारी-कर्मचाऱयांच्या सोयीसाठी मुंबई मेट्रो मध्यरात्री 12 वाजेपर्यंत धावणार आहे. पहाटे 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत विशेष अतिरिक्त फेऱ्या चालवण्याचा निर्णय मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) घेतला आहे. निवडणूक डय़ुटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना वेळेत मतदान केंद्रावर पोहोचता यावे यासाठी मेट्रोची सेवा पहाटे 5 वाजल्यापासूनच सुरू केली जाणार आहे, तर कर्मचाऱयांच्या परतीच्या प्रवासासाठी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत मेट्रोसेवा सुरू राहणार असल्याचे ‘एमएमआरसी’ने जाहीर केले.