मलेरियाविरोधात पालिकेची उद्यापासून विशेष मोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महापालिका जागतिक मलेरियाविरोधी दिनानिमित्त सोमवार, 25 एप्रिलपासून महिनाभर विशेष मोहीम राबवणार असून त्यासाठी घरोघरी जाऊन रक्ताची तपासणी केली जाणार आहे. मुंबई पालिकेच्या 190 दवाखान्यांतही मलेरियाच्या चाचण्या केल्या जाणार आहेत. मुंबई महापालिपेने कोरोनाची तिसरी लाट यशस्वीपणे रोखली असून मलेरिया, डेंग्यू तसेच इतर संसर्गजन्य आजारांविरोधातही मोहीम वर्षभर सुरू असते. जागतिक मलेरिया दिनाच्या पार्श्वभूमीवर मलेरियाविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन तसेच बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱया मजुरांची रक्त तपासणी करणार आहेत. दरम्यान, मलेरियाची लक्षणे आढळली तर रहिवाशांनी रक्त चाचणी करून घ्यावी आणि योग्य औषधोपचार घ्यावेत, असे आवाहन कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.