
मुंबई महापालिका पदाधिकाऱयांच्या सेवेसाठी नवीन गाड्या खरेदी करणार आहे. सहा महिन्यांपूर्वी घेतलेल्या स्कॉर्पिओ गाड्या सोयीच्या नसल्याने महागड्या इनोव्हा क्रिस्टा गाड्या घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी असल्याची टीका विरोधकांनी केली.
सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, उपमहापौर आणि तीन वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांना नव्या इनोव्हा क्रिस्टा गाड्या घेण्याची मागणी करण्यात आली आहे. नवीन गाड्यांचा प्रस्ताव लवकरच महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.
यावर महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या, जानेवारीत 54 गाड्या घेतल्या. प्रशासन काळात या गाड्या पाच वर्षांसाठी घेतल्या होत्या. आपण या गाड्या पाच वर्षे वापरूया ना. गाडी बरोबर नाही, पाठ दुखते असं काहीजण म्हणतायत. स्कॉर्पिओचे नाव घेऊन त्यांचे मार्पेट बदनाम करण्याचे काम करतायत का? अशा पद्धतीने पालिकेची लूटमार करत असतील तर योग्य नाही. आयुक्त हे काय यांचे लाड पुरवायला बसले आहेत का?





























































