
मुंबई महानगरपालिका पहिल्यांदाच कॅन्सर केअर सेंटर सुरू करणार आहे. यामध्ये शरीरातील इतर पेशींना धक्का न लावता फक्त कर्करोगाच्या पेशी नष्ट करणाऱया ’प्रोटोन थेरपी’सह केमोथेरपी, मॅमोग्राफी, सोनोग्राफी, डेटा अॅनालेसिस, ब्रेकीथेरपीसह कॅन्सरवरील अत्याधुनिक उपचार सुविधा मिळणार आहेत. यासाठी मुंबईत जागा निश्चित करून नियोजन व अंमलबजावणी करण्यासाठी सल्लागार नेमला जाणार आहे.
कॅन्सरसारख्या घातक आजारावर उपचारासाठी पालिकेच्या रुग्णालयात मोठया प्रमाणात सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे गरीब, गरजू रुग्णांना या उपचारासाठी खासगी किंवा उपलब्ध संस्थांच्या अपुऱया आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. या ठिकाणच्या प्रतीक्षा यादीमुळे आजार आणखी बळावल्याचे प्रकार घडतात. त्यामुळे पालिकेने स्वतः कॅन्सर केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. हा सल्लागार प्रोटोन थेरपीसाठी तांत्रिक तपशील आणि यंत्रसामग्रीचे तपशील तयार करणे, प्रकल्पाचा आराखडा तयार करणे, मुंबईत प्रकल्पासाठी जागा निश्चित करणे, पुरवठादार ओळखणे आणि कामकाज वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी पर्यवेक्षण करणे अशी कामे करणार आहे. सुमारे तीन एकर क्षेत्रावर हा प्रकल्प उभारला जाणार असून त्यासाठी सुमारे 100 कोटींचा खर्च केला जाणार आहे. याबाबाबचा प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.
प्रोटोन थेरपी
कमीत कमी डोस देऊन कर्करोगाच्या अधिकाधिक पेशी नष्ट करून, केमोथेरपीचे सर्व दुष्परिणाम टाळून शरीरातील इतर पेशींना न मारता फक्त कर्करोगाच्या पेशींवर हल्ला करणाऱया व केवळ टय़ुमरला लक्ष्य करणारी रेडिएशन प्रकारातील ‘प्रोटोन थेरपी’ ही कॅन्सरवरील सर्वात अत्याधुनिक व प्रभावी उपचार पद्धती पालिकेच्या पॅन्सर केअर सेंटरमध्ये असेल.
हे उपचार मिळणार
z कॉम्पॅक्ट सिंगल रूम प्रोटोन थेरपी सिस्टम z एसपीईसीटी गामा पॅमेऱयासह पीईटी-सीटी z एचडीआर ब्रेकीथेरपीसह एलआयएनआयएसी z 1.5 टी एमआरआय, 128 स्लाईस सीटी z मॅमोग्राफी, सोनोग्राफी z डेटा अॅनालिसिस सेंटरसह केमोथेरपी































































