भरपावसातही खड्डे बुजवणार रिऍक्टिव्ह अस्फाल्ट तंत्रज्ञान, महापालिका करणार अडीच कोटींचा खर्च

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकरांच्या सुरळीत प्रवासासाठी पालिका भरपावसातही खड्डे बुजवता येणारे ‘रिऍक्टिव्ह अस्फाल्ट’ तंत्रज्ञान वापरणार आहे. या तंत्रज्ञानामुळे वर्षभर खड्डे बुजवता येणार आहेत. यासाठी 2 कोटी 68 लाख 27 हजार 520 रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी मंजुरी दिली आहे.

मुंबईत विशेषतः पावसाळ्यामध्ये रस्त्यावर खड्डय़ांची समस्या मोठय़ा प्रमाणावर निर्माण होते. या पार्श्वभूमीवर पालिकेने गेल्या काही वर्षांपासून खड्डे बुजवण्यासाठी ‘कोल्डमिक्स’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला. मात्र याची परिणामकता कमी होऊ लागल्याने पालिकेवर खड्डय़ांकरून मोठय़ा प्रमाणात टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने खड्डे बुजवण्यासाठी नव्हा पर्यायांचा शोध सुरू केला होता. यामध्ये घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये ‘रिऍक्टिव्ह अस्फाल्ट’ तंत्रज्ञान योग्य ठरल्याचे समोर आले आहे. यासाठी पालिकेने  या तंत्रज्ञानाने खड्डे बुजकण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. यामध्ये मे. इको ग्रीन इप्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट प्रा. लि. कंपनीची निवड झाली आहे.

असे आहे तंत्रज्ञान

रिऍक्टिव्ह अस्फाल्ट तंत्रज्ञानात केमिकल व डांबराचा कापर करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे वाहनांच्या टायरला रिऍक्टिव्ह अस्फाल्ट चिकटणार नाही. तसेच खड्डा बुजवल्यानंतर पुढील दोन मिनिटांत गाडी जाऊ शकते. पाऊस सुरू असतानाही या तंत्रज्ञानाचा वापर करता येणार आहे. डांबरी रस्त्यांसाठी हे तंत्रज्ञाना वापरले जाणार आहे.

तीन कर्षे देखभाल–दुरुस्तीची जबाबदारी

पालिकेने दिलेल्या कामानुसार कंत्राटदाराला मुंबई शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम करावे लागणार आहे.

या कामानंतर पुढील 36 महिने म्हणजे पुढील तीन वर्षे संबंधित कामाची देखभाल-दुरुस्ती करावी लागणार आहे. या कालावधीत एकूण बिलापैकी कामाच्या 10 टक्के रक्कम रोखून ठेवली जाणार आहे.