
सामना प्रतिनिधी । नगर
मोटारसायकलीचे बनावट कागदपत्रे तयार करून अनेकांना गंडविणार्या भामट्यास गजाआड करण्यास स्थानिक गुन्हे शाखेने यश आले आहे. आरोपीमध्ये विश्वजीत रमेश कासार (वय 25, रा. वाळकी, ता. नगर) असे गजाआड केलेल्या आरोपीचे नाव आहे.
कासार याच्यावर अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल असून, तो अनेक महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार कासार हा कोरेगाव, ता. श्रीगोंदा येथे आला. तत्पूर्वी, स्थानिक गुन्हे शाखेने कोरेगावात सापळा रचून कासार याला अटक केली आहे. साहाय्यक फौजदार सोन्याबापू नाणेकर, पोहेकॉ दत्तात्रय गव्हाणे, रवींद्र कर्डिले, दिगंबर कारखेले, संभाजी कोतकर, राहुल सोळुंके यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. दरम्यान, आरोपी कासार याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याला कोतवाली पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.






























































