
देशात पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून बॉलिवूडमध्येही अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण होत आहे. अभिनेता जॉन अब्राहम यालाही कोरोनाची लागण झाली आहे.
जॉन आणि त्याची पत्नी प्रिया हे दोघेही कोरोनाबाधित झाले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून जॉनने ही माहिती सांगितली आहे. 3 दिवसांपूर्वी भेटलेल्या एका व्यक्तिला कोरोना झाल्यामुळे आम्हीही आमची तपासणी करून घेतली. तेव्हा माझी आणि प्रियाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आम्ही आमच्या घरातच क्वारंटाईन झालो आहोत आणि कोणाच्याही संपर्कात आलेलो नाही, असं जॉनने त्याच्या पोस्टमधून स्पष्ट केलं आहे.
आम्हा दोघांचंही लसीकरण पूर्ण झालं आहे. आम्हाला कोरोनाची सौम्य लक्षणं दिसत आहेत. कृपया तुम्ही तंदुरुस्त राहा आणि मास्क आवर्जून वापरा, असंही जॉन पुढे म्हणाला आहे. जॉन आणि प्रियापूर्वी अर्जुन कपूर, त्याची बहीण अंशुला कपूर, करिना कपूर, अमृता अरोरा यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.


























































