ऐतिहासिक सिनेमांवर बॉलीवूडची भिस्त; तीन हजार कोटी लावले पणाला, पुढच्या वर्षी 10 मेगाबजेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इतिहासकालीन सिनेमा बघायला प्रेक्षकांना आवडतात. करोडो बजेटच्या ऐतिहासिक पटांमागे जोखीम निश्चित असते. काही सिनेमा बॉक्स ऑफिस कमाईचा इतिहास रचतात, तर काही सुरुवातीलाच मान टाकतात. ‘पृथ्वीराज’ या अक्षय कुमारच्या पीरीयड ड्रामाची सध्या चर्चा आहे. सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर हा सिनेमा आहे. त्याचे 300 कोटी रुपयांचे बजेट आहे. 2022 मध्ये मात्र अनेक फिल्ममेकर अशी जोखीम पत्करायला तयार झालेले दिसत आहेत. केवळ ‘पृथ्वीराज’ हा सिनेमा नव्हे तर अन्य दहा ऐतिहासिक पट नव्या वर्षात येत आहेत.

‘आदिपुरुष’ हा ओम राऊतचा सिनेमा रामायणावर आधारित आहे. यामध्ये प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत प्रभास तर लंकेशाच्या भूमिकेत सैफ अली खान आहे.

‘आरआरआर’ सिनेमात दोन महान स्वातंत्र्यसैनिकांची कहाणी आहे. राजामौली ‘आरआरआर’ तामीळ, तेलगू, हिंदीसह दहा भाषांमध्ये प्रदर्शित करणार आहेत.  7 जानेवारी 2022 रोजी  ‘आरआरआर’ प्रदर्शित होईल.

‘सीता – द इन्कारनेशन’ या पौराणिक सिनेमाचे दिग्दर्शन अलौकिक देसाई करणार आहेत.

‘ब्रम्हास्त्र’ हा पौराणिक कथेवरील सायफाय सिनेमा तीन भागांत येईल. अयान मुखर्जी त्याचे दिग्दर्शन करत आहेत. आलिया-रणबीरव्यतिरिक्त अमिताभ बच्चन, मौनी रॉय, डिंपल कपाडिया हे कलाकार ‘ब्रम्हास्त्र’मध्ये दिसतील.

‘द इमोर्टल अश्वत्थामा’ सिनेमातून महाभारतातील महान योद्धा अश्वत्थामाची कहाणी मोठय़ा पडद्यावर येईल. अश्वत्थामाची भूमिका विक्की काwशल साकारेल.

‘द गुड महाराजा’ सिनेमा दुसऱया महायुद्धातील रशियन शूटरच्या जीवनावर आहे. याचे शूटिंग रशिया, लंडन, पोलंड, गुजरात येथे झाले आहे.

‘शमशेरा’ हा रणबीर कपूरचा ऐतिहासिक सिनेमा 18 मार्च रोजी प्रदर्शित होईल. आपल्या हक्कासाठी इंग्रजांशी लढणाऱया एका टोळीप्रमुखाची ही कथा आहे.

‘राम सेतू’ या सिनेमाचे दोन पोस्टर गेल्या वर्षी अक्षय कुमारने शेअर केले होते. अभिषेक शर्मा त्याचे दिग्दर्शक आहेत.

‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ सिनेमात कोरेगाव लढाईदरम्यानच्या घटना आहेत.